Chinchwad: बापलेकाकडून तरुणावर प्राणघातक हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – माझ्या बहिणीचे लग्न का जमू देत नाही?, असे म्हणत बापलेकाने एका तरुणावर खूनी हल्ला केला. ही घटना मंगळवारी (दि. 19) शंकरनगर, चिंचवड येथे घडली.

रतन सोपान आवळे (वय 27, रा. चिंचवड) असे खूनी हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सुप्रिम राजू काळे (वय 21) आणि राजू काळे (वय 60, दोघेही रा. शंकरनगर, चिंचवड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अभिमान सोपान आवळे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुप्रिम याला पोलिसांनी अटक केली आहे.

मंगळवारी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास आरोपी सुप्रिम आणि त्याचे वडिल राजू काळे यांनी रतन याला रस्त्यात अडविले. तू माझ्या बहिणीचे लग्न का जमू देत नाही, अशी विचारणा करीत सुप्रिम याने धारदार शस्त्राने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तर त्याचे वडिल राजू काळे याने लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली, असे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक अन्सार शेख करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.