Chinchwad : दुचाकी दिली नाही म्हणून वडिलांची मुलीला अमानुष मारहाण

एमपीसी न्यूज – मुलीने वडिलांना दुचाकी दिली नाही. या कारणावरून वडिलांनी मुलीला लोखंडी सळईने अमानुषपणे मारहाण केली. हा प्रकार मंगळवारी (दि. 25) सायंकाळी सातच्या सुमारास चिंचवड मधील केशवनगर येथे घडला.

मोनिका सुरेश माने (वय 28, रा. काकडे टाऊनशिप, केशवनगर, चिंचवड) या मुलीने याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सुरेश विठ्ठल माने (वय 60, रा. काकडे टाऊनशिप, केशवनगर, चिंचवड) याच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनिका चिंचवड येथे नोकरी करतात. त्यांच्याकडे अॅक्टिव्हा दुचाकी आहे. ही दुचाकी त्यांचे वडील सुरेश यांनी मागितली. परंतु मोनिका यांनी कामाच्या घाईमुळे ती दिली नाही. याचा राग मनात धरून सुरेश यांनी मोनिकाला भिंतीवर ढकलले. तसेच लोखंडी सळईने पाठीवर, पोटावर अमानुषपणे मारहाण केली. मोनिकाच्या नाकावर डोक्याने टक्कर मारली, यामध्ये मोनिकाच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले. यानंतर सुरेश यांनी मोनिकाच्या आई आणि बहिणीला धमकी दिली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.