Chinchwad : बेकायदेशीरपणे हॉस्टेलमध्ये घुसून पिता-पुत्राला मारहाण; चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – चार जणांनी बेकायदेशीरपणे हॉस्टेलमध्ये प्रवेश करून मुलगा आणि त्याच्या वडिलांना शिवीगाळ करून मारहाण केली. याबाबत चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 27) पहाटे साडेतीनच्या सुमारास आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ घडली.

विरेश बेबळकर (वय 25), महेश हाडमोडे (वय 26), विशाल लोहार (वय 28) आणि अन्य एकजण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अनिकेत किशोर पंजाबी (वय 21, रा. आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास आरोपींनी फिर्यादी अनिकेत यांच्या होस्टेलमध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश केला. अनिकेत यांच्या वडिलांना शिवीगाळ करून अनिकेत यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये अनिकेत जखमी झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.