Chinchwad: लिंकवर क्लिक करून अर्ज भरा आणि मिळवा घरपोच जीवनावश्यक वस्तू – आमदार लक्ष्मण जगताप

आमदार लक्ष्मण जगताप यांचा उपक्रम

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी  लॉकडाऊनच्या काळात सोशल डिस्टन्सिंगचे शंभर टक्के पालन व्हावे यासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी मतदारसंघातील नागरिकांना सर्व अत्यावश्यक सुविधा घरपोच देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.  नागरिकांना त्यांच्या गरजेच्या वस्तूंची मागणी सुलभतेने नोंदविता यावी यासाठी त्यांनी एक ऑनलाइन फॉर्मची लिंक बनविली आहे. नागरिकांनी या लिंकवर क्लिक केल्यानंतर ओपन होणाऱ्या फॉर्ममध्ये त्यांचे नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी आणि त्यांना आवश्यक असलेल्या वस्तूंचा उल्लेख करून तो सबमिट करावयाचे आहे. या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे नागरिकांना आपल्या मोबाईलवरून जीवनावश्यक वस्तूंची अगदी सोप्या पद्धतीने मागणी करता येणार आहे. 

 

त्यानंतर  ऑनलाइन फॉर्ममध्ये नोंदविलेल्या जीवनावश्यक वस्तू संबंधित नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत.  गेल्या अनेक दिवसांपासून जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. भारतामध्ये देखील याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. कोरोना विषाणूच्या संक्रमणांपासून बचाव व्हावा, यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवडमधील ‘चंद्ररंग  चॅरिटेबल ट्रस्ट’ या संपूर्ण परिस्थितीशी लढण्याकरिता आणि नागरिकांच्या मदतीकरिता सज्ज आहे.

याचाच एक भाग म्हणून लॉकडाऊनच्या काळात ज्या गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची आवश्यकता आहे अशांना चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सहाय्यता करण्यात येणार आहे.  आपणांस जर जीवनावश्यक वस्तूंची आवश्यकता असेल तर खालील फॉर्म भरावा. चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आपल्याला मदत करण्याचा नक्की प्रयत्न करेल.

फॉर्म भरण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://bit.ly/2QQmftu

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.