Chinchwad: जमावबंदीचे उल्लंघन करून भांडण करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा

Chinchwad: FIR against five people for violation of curfew

एमपीसी न्यूज- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करून आपसात भांडणे करणाऱ्या पाच जणांवर चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

निकेश बाळू आल्हाट (वय 19), संकेत बाळू आल्हाट (वय 22), दीपक रामचंद्र वाघमारे (वय 30, तिघे रा. विजयनगर झोपडपट्टी, चिंचवड), दीपक रामचंद्र वाघमारे (वय 30, रा. केशवनगर, चिंचवड), मारोती रामचंद्र वाघमारे (वय 34, रा. गावडे तलावाजवळ, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी पोलीस शिपाई नागनाथ दगडू कांबळे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.5) रात्री पावणे अकरा वाजता विजयनगर झोपडपट्टी, चिंचवड येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून किरकोळ कारणांवरून भांडण सुरु आहे. त्या भांडणाच्या रागातून शुक्रवारी रात्री ते आपसात शिवीगाळ करत भांडण करत होते. याची माहिती चिंचवड पोलिसांना मिळाली असता चिंचवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. या आदेशानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी आहे. असे असतानाही आरोपी एकमेकांशी सार्वजनिक ठिकाणी भांडताना आढळून आले.

पोलिसांनी पाचही जणांवर भारतीय दंड विधान कलम 160, 188 नुसार गुन्हा दाखल केला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.