Chinchwad : चिंचवड येथील महिंद्रा कंपनीत आग

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील महिंद्रा कंपनीत आग लागल्याची घटना आज (रविवारी) सकाळी साडेनऊ वाजता घडली.

_MPC_DIR_MPU_II

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेनऊच्या सुमारास चिंचवड येथील संघवी केसरी कंपाउंड जवळ असलेल्या महिंद्रा कंपनीत आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे चार बंब घटनास्थळी रवाना करण्यात आले. दीड तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. या आगीवर नियंत्रण मिळवत असतनाच जवानांना चिखली येथे आग लागल्याची माहिती मिळाली.

जवानांनी देहू-आळंदी रस्त्यावरील हरगुडे वस्ती, चिखली येथे एका भंगारच्या गोडाऊनला लागलेल्या आगीकडे अग्निशमन विभागाचे सात बंब घटनास्थळी दाखल झाले. भंगारच्या गोडाऊनमध्ये केमिकलचे रिकामे आणि भरलेले केमिकलचे ड्रम होते. या ड्रम पर्यंत आग पोहोचल्याने आगीचा भडका उडाला. दोन्ही घटनांमध्ये कोणीही जखमी नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.