Chinchwad : थेरगाव आणि चिखली येथे आगीच्या घटना; जीवितहानी नाही

लाखो रुपयांचे नुकसान झाले. Fire incidents at Thergaon and Chikhali; No casualties

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज (बुधवारी, दि. 19) थेरगाव आणि चिखली येथे दोन आगीच्या घटना घडल्या. सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये जीवितहानी झाली नाही. मात्र, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

पहिली घटना कुदळवाडी -चिखली येथे घडली. कुदळवाडी येथील एका भंगाराच्या गोदामाला पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली.

याची माहिती चिखली पोलिसांनी अग्निशमन विभागाला दिली. त्यानुसार अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशामक दलाच्या जवानांनी चार तासात आगीवर नियंत्रण मिळविले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गोदाम पूर्णपणे जळून खाक झाले आहे.

दुसरी घटना थेरगाव येथे घडली. सुरेश दगडू चेमटे यांच्या वेंकटेश्वरा ॲग्रोटेक इंडस्ट्रीज येथे सकाळी सव्वा दहा वाजताच्या सुमारास अचानक आग लागली.

या आगीमध्ये कंपनीतील मशीन, फॅन आणि इलेक्ट्रिकल साहित्य जळाले आहे. यात सुमारे 20 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

या घटनेतही कोणतीही जीवित हानी झाली नाही. रहाटणी अग्निशमन विभागाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळविले. दरम्यान या आगीचे लोट परिसरात पसरले होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.