Chinchwad : फोक फिटनेस आणि नाट्यकार्यशाळेचे शनिवारी आयोजन

एमपीसी न्यूज – चिंचवडच्या थिएटर वर्कशॉप कंपनीच्या पैस रंगमंचावर मोफत नाट्य कार्यशाळा आणि फोक फिटनेस प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

ही कार्यशाळा चिंचवड स्टेशनच्या प्रिमियर प्लाझा इमारतीत हस्तकला शोरुमच्यावर तिस-या मजल्यावर पैस रंगमंचावर होणार आहे. शनिवार (१६ फेब्रुवारी) आणि रविवारी (१७ फेब्रुवारी) रोजी दोन दिवसीय नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा शनिवार आणि रविवारी दुपारी १ ते ४ या वेळात होणार आहे.

  • या कार्यशाळेत नाट्यविषयक प्राथमिक प्रशिक्षणासह नाट्यखेळ घेण्यात येणार आहेत. नाट्यक्षेत्रात येऊ इच्छिणा-यांसाठी शास्त्रोक्त नाट्यप्रक्रीयेची माहिती असणे आवश्यक आहे. याच विचाराने नाट्यप्रक्रीया आणि त्याची शास्त्रोक्त माहिती या कार्यशाळेत दिली जाईल. नाटकासाठीचे अविभाज्य घटक, शब्दोच्चार, शारीरिक हालचाली यांचा अंतर्भाव या नाट्य कार्यशाळेत असणार आहे. लेखक दिग्दर्शक प्रभाकर पवार ही कार्यशाळा घेणार आहे.

तर, रविवारी (१७ फेब्रुवारी) सकाळी साडेसात ते साडेआठ या वेळात फोक फिटनेस आणि योगाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या दोन्ही कार्यशाळा सर्वांसाठी खुल्या आहेत. हे सर्व प्रशिक्षण मोफत असून त्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे यासाठी ८६६९२२०६१२, ९९७०९१०१०९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.