Chinchwad : चिंचवडगावातील फुटपाथ गायब

एमपीसी न्यूज -फूटपाथ हे पादचाऱ्यांसाठी तयार करण्यात येतात. मात्र या फुटपाथवर होणाऱ्या अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना येथून जाणे अवघड होऊन जाते. चिंचवडगावातील आयसीआयसीआय बँके समोरील फूटपाथची दुरवस्था झाली असून काही ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक उखडले आहेत. येथील दुकानदारांनी फुटपाथवर बोर्ड लावून फुटपाथ आणखी अरुंद केला आहे. त्याचप्रमाणे फुटपाथवर सिमेंटचे मोठे ब्लॉक टाकून रस्ता अडवला आहे. या फुटपाथवरील अतिक्रमण हटवून फुटपाथ मोकळा करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.