Chinchwad : शिक्षणाबरोबर परदेशी भाषा आत्मसात करावी – डॉ. दीपक शिकारपुरकर

एमपीसी न्यूज – येणाऱ्या काळात कल्पकतेला महत्व राहणार आहे. यासाठी शिक्षणाबरोबर एखादी परदेशी भाषा आत्मसात करणे. काळाचीच गरज निर्माण झाली आहे. संगणक आदी क्षेत्रातील नवीन घडामोडी आत्मसात केल्या पाहिजेत. त्यासाठी ध्येय निर्मिती चिकाटी, अथक परिश्रम केले पाहिजे. मिळालेल्या संधीचे सोने करण्याची क्षमता पाहिजे. असे केले तर उत्तम भवितव्य मिळेल, असे मत संगणक तज्ञ डॉ. दीपक शिकारपुरकर यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.

चिंचवड येथील प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अंड कॉम्प्युटर स्टडीज आयोजित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपक्रमांतर्गत दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या परिसंवादाच्या उदघाटन प्रसंगी डॉ. दीपक शिकारपुरकर बोलत होते.

या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी कमला शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्य डॉ. जयश्री मुळे, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, शिक्षण शास्त्र महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ.पोर्णिमा कदम, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या वनिता कुऱ्हाडे तसेच पिंपरी-चिंचवड पुणे जिल्ह्याबरोबरच राज्य व राज्याबाहेरील विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते.

डॉ. शिकारपूर म्हणाले, “सध्या आपण जागतिक स्पर्धेला तोंड देत आहोत, या जीवघेण्या स्पर्धेत टिकायचे असेल तर विद्यार्थीदशेपासून कामामध्ये सतत सुधारणा करणे आवश्यक आहे. २१ व्या शतकात तंत्रज्ञानात आमूलाग्र बदल झाले आहेत. कार्पोरेटचे युग आले आहे. ग्राहकांचे महत्व वाढले आहे. घरबसल्या बँकिंग व्यवहार, वस्तूची आयात होत आहे. ऑनलाईन पद्धतीचा अवलंब मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. विद्यार्थांनी गुगलवर आवश्यक माहिती आत्मसात केली पाहिजे”

यावेळी डॉ. दीपक शहा, डॉ. ज्योती ओरा (मुंबई), (इम्पक्ट ऑफ टेक्नोलॉजी अ बायोकेमिस्ट पस्पेक्टीव्ह) मनीष सिंग व अंशू कुमार, दिल्ली, (इंटरनेट ऑफ थिंगस) अभिजित घोळे (मशीन लर्निंग, साजिद पठाण (डाटा अन्लीटीक्स) संजयकुमार (क्लाउड कॉम्पुटिंग), डॉ. दीपक वोरा (व्यक्तीमत्व विकास), डॉ. सचिन कदम (सायबर सिक्युरिटी) बिनॉय जाफर (न्याचरल लँग्वेज प्रोसेसिंग), डॉ. अजयकुमार (नेट्वर्किंग) यांनी मार्गदर्शन केले.

प्रास्ताविक प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. निलांबरी काळे व जेन्सी मथ्यू यांनी केले तर आभार उपप्राचार्या डॉ. जयश्री मुळे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.