Chinchwad: माजी नगरसेवक मोरेश्वर गोलांडे यांचे निधन

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाचे प्रथम सभापती, माजी नगरसेवक मोरेश्वर ऊर्फ अप्पासाहेब भागुजी गोलांडे (वय 83 वर्षे) यांचे बुधवरी (दि.15) वृद्धापकाळाने निधन झाले.

मोरेश्वर गोलांडे हे 1983 ते 1992 आणि 1992 ते 1997 या कालावधीत दोन वेळा पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नगरसेवक होते. 1986 साली ते शिक्षण मंडळाचे सभापती झाले. त्याचप्रमाणे त्यांनी चिंचवड येथे नूतन शिक्षण संस्थेची स्थापना केली.

त्यांच्या पश्चात चिरंजीव ॲड. अविनाश गोलांडे, रमेश गोलांडे, उमेश गोलांडे, अंकुश गोलांडे, सूना, नातवंडे असा परिवार आहे. तसेच गांधी पेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ गोलांडे यांचे ते चुलते होत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.