Chinchwad : चिंचवडमध्ये चार लाखांची घरफोडी

Four lakh burglary in Chinchwad

एमपीसी न्यूज – एका तरूणीने घरातील कपाटामधील ठेवलेले सोन्याचे दागिने, रोकड असा चार लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना चिंचवड येथे नुकतीच घडली.

याप्रकरणी गणेश भल्लाजी पिरहार (वय-45, रा. चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार  19  वर्षीय तरुणीवर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या घरातील कपाटात ठेवलेले 35 ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस, 20 ग्रॅमची एक चैन, दोन अंगठ्या, रोकड असा 3 लाख 94 हजार 500 रूपयांचा ऐवज चोरून नेला.

चिंचवड पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.