Chinchwad : भांडणाची विचारपूस करणाऱ्या शेतकऱ्याला बांबूने मारहाण

एमपीसी न्यूज – तरुणाचे भांडण सुरू असताना त्याला ‘भांडण का करत आहात?’ असे विचारल्यावरून चौघांनी मिळून एका शेतकऱ्याला लाकडी बांबूने मारहाण केली. यामध्ये शेतकरी गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी (दि. 19) रात्री आठच्या सुमारास वाल्हेकर वाडी येथील मातृ विद्यालयाच्या मागच्या बाजूला घडली.

निलेश ज्ञानेश्वर आहेर (वय 35, रा. वाल्हेकरवाडी चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार स्वप्निल वाघमारे, किरण खवले, नाया, बंट्या (पूर्ण नाव, पत्ता माहित नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री आठच्या सुमारास मातृ विद्यालयाच्या मागच्या बाजूला स्वप्निल वाघमारे याचे भांडण सुरू होते. त्यामुळे निलेश तिथे गेले आणि स्वप्निलला विचारले की ‘काय करतोस, तुला काय अडचण आहे?’ यावरून चिडलेल्या स्वप्निलने लाकडी बांबूने निलेश यांच्या डोक्यात मारले. तर, अन्य तिघांनी निलेश यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली.

निलेश यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी पडून गहाळ झाली. याबाबत त्यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. चिंचवड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.