Chinchwad : धक्का लागला म्हणून चौघांनी केली तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज – धक्का लागला म्हणून चौघांनी (Chinchwad) एका 22 वर्षीय तरुणाला दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. हा प्रकार काळावाडी पुलाजवळ चिंचवड येथे रविवारी (दि.20) रात्री घडला आहे.

याप्रकरणी ओमकार संभाजी खेडकर (वय 22, रा.चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून प्रणव उर्फ पिल्या कांबळे, शुभम चंद्रकांत कळमकर, पार्थ मांडवकर, आदित्य उर्फ भद्र्या चव्हाण सर्व राहणार चिंचवड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : अटक टाळण्यासाठी आरोपीने पोलिसांवर हल्ला करत केला आत्महत्येचा प्रयत्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचा मित्रासह चिंचवड येथे हॉटेलमध्ये पार्सल आणण्यासाठी गेले होते. यावेळी आरोपी यांना धक्का लागला. याचा राग येऊन आरोपींनी वाद घालत फिर्यादी यांना दगडाने व लाथाबुकक्यांनी मारहाण करत फिर्यादी व त्यांच्या मित्राला जखमी केले. यावरून चिचंवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.