Chinchwad : मोबाईल हिसकावणा-या तिघांकडून चार फोन जप्त

एमपीसी न्यूज – मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून चोरून नेणार्‍या तिघांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून चार मोबाईल फोन, एक टॅब आणि मोपेड दुचाकी असा एकूण 85 हजार रुपयांचा ऐवज जप्त  केला. ही कारवाई चिंचवड पोलिसांनी केली.

केतन मिलिंद गायकवाड (वय 24, रा. नक्षत्रम बिल्डिंग, घरकुल, चिखली), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्यासोबत दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल फोन हिसकावून चोरून नेणाऱ्या चोरट्यांबाबत चिंचवड पोलीस तपास करीत होते. दरम्यान चिंचवड पोलीस ठाण्यात एक मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्या गुन्ह्यातील मोबाईल फोन शोधत असताना तपास पथकाला मोबाईल फोन हिसकावणा-या केतन गायकवाड याच्याबाबत माहिती मिळाली. पोलिसांनी केतन गायकवाड आणि त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले. तिघांकडून 4 मोबाइल फोन आणि एक सॅमसंग कंपनीचा टॅब तसेच गुन्ह्यात वापरलेली मोपेड दुचाकी असा एकूण 85 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजीत खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, पोलीस कर्मचारी जगताप, शेलार, पाटील, भदाणे, राठोड, माने, जाधव यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.