Chinchwad : पिंपरी-चिंचवड शहरात कारसह चार वाहने चोरीला

वाहन चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. : Four vehicles including a car were stolen in Pimpri-Chinchwad

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात चाकण, भोसरी एमआयडीसी, निगडी आणि वाकड परिसरातून अज्ञात चोरट्यांनी चार वाहने चोरून नेली आहेत. यामध्ये तीन दुचाकी आणि एका कारचा समावेश आहे. याबाबत सोमवारी (दि. 10) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वाहन चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

वाहन चोरीची पहिली घटना 8 ऑगस्ट रोजी सकाळी नाणेकरवाडी येथे उघडकीस आली. याबाबत सोमनाथ बाजीराव रणदिवे (वय 30, रा. नाणेकरवाडी, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रणदिवे यांनी त्यांची 15 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 11 / बीक्यू 9150) राहत्या इमारतीच्या पार्किंगमध्ये 7 ऑगस्ट रोजी रात्री पार्क केली होती. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुचाकीचे हॅंडललॉक तोडून दुचाकी चोरून नेली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

वाहन चोरीची दुसरी घटना 6 ऑगस्ट रोजी मोशी गावठाण येथे उघडकीस आली. दीपक सोपान कुटे (वय 31, रा. कुटे आळी, मोशी गावठाण) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुटे यांनी त्यांची 15 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 14 / डीवाय 1581) 6 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता घरासमोर पार्क केली होती. घरासमोरून अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी भर दिवसा चोरून नेली. सकाळी साडे अकरा वाजता हा प्रकार उघडकीस आला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

वाहन चोरीची तिसरी घटना 4 ऑगस्ट रोजी नढेनगर, काळेवाडी येथे उघडकीस आली. मोहंमद शफिक नरमहंमद शेख (वय 24, रा. नढेनगर,काळेवाडी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख यांनी त्यांची 30 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 14 / ईएक्स 1782) 4 ऑगस्ट रोजी दुपारी पाच वाजता घरासमोर पार्क केली होती.

अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी घरासमोरून चोरून नेली. हा प्रकार रात्री अकरा वाजता उघडकीस आला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

वाहन चोरीची चौथी घटना राजनगर, निगडी येथे 9 ऑगस्ट रोजी उघडकीस आली. अयुब फतुलाल तांबोळी (वय 50, रा. ओटास्कीम, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तांबोळी यांनी त्यांची दोन लाख 75 हजार रुपये किमतीची कार (एम एच 14 / डी एन 5066) 8 ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजता राजनगर, निगडी येथे तुळजा भवानी मंदिरासमोर पार्क केली होती.

रात्री अज्ञात चोरट्यांनी कारचे लॉक तोडून कार चोरून नेली. हा प्रकार दुस-या दिवशी 9 ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आला.

निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.