Chinchwad : पिंपरी, चाकण, हिंजवडी, देहूरोडमधून चार वाहने चोरीला

वाहनचोरीच्या घटनांमुळे पिंपरी-चिंचवडकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. : Four vehicles were stolen from Pimpri, Chakan, Hinjewadi and Dehu Road

एमपीसी न्यूज – पिंपरी, चाकण, हिंजवडी आणि देहूरोड परिसरातून चार दुचाकी वाहने चोरीला गेली आहेत. याबाबत बुधवारी (दि. 12) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दिवसेंदिवस वाढत असलेल्या या वाहनचोरीच्या घटनांमुळे पिंपरी-चिंचवडकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

पहिल्या घटनेत राम महादेव आडसुळे (वय 32, रा. विठ्ठलनगर, नेहरूनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राम यांनी त्यांची 25 हजार रुपये किमतीची एमएच 14 / ईझेड 6271 ही दुचाकी 26 जुलै रोजी रात्री त्याच्या घरासमोर पार्क केली होती. रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. 27 जुलै रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

दुस-या घटनेत कैलास महादेव परदेशी (वय 35, रा. भुजबळ आळी, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कैलास यांनी त्यांची रॉयल इनफिल्ड बुलेट (एमएच 14 / एचसी 0302) 10 ऑगस्ट रोजी त्यांच्या घरासमोर पार्क केली होती. घराच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्यांनी त्यांची बुलेट चोरून नेली.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

तिस-या घटनेत निगप्पा जेरअप्पा करबार (वय 50, रा. किवळे गाव) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निगप्पा यांनी त्यांची 10 हजार रुपये किमतीची स्प्लेंडर दुचाकी (एम एच 14 / एवाय 6321) 10 ऑगस्ट रोजी रात्री ताथवडे येथे रामा कन्स्ट्रक्शन साईट शिरोळे पेट्रोल पंपाच्या मागे पार्क केली. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुचाकी लॉक तोडून चोरून नेली. 11 ऑगस्ट रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

चौथ्या घटनेत ललित गिरीधर परमार (वय 42, रा. सिद्धिविनायक नगरी, निगडी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ललित यांनी त्यांची 25 हजार रुपये किमतीची होंडा स्प्लेंडर (एमएच 14 / जीडब्ल्यू 5066) दुचाकी 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी भक्ती शक्ती चौकाजवळ पुना गेट हॉटेलसमोर पार्क केली. त्यांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार रात्री नऊ वाजता उघडकीस आला.

देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.