Chinchwad : पिंपरी, दिघी, तळेगाव, चिखली येथून चार वाहने चोरीला

याबाबत रविवारी (दि. 16) अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. : Four vehicles were stolen from Pimpri, Dighi, Talegaon and Chikhali

एमपीसी न्यूज – पिंपरी परिसरातून मोपेड दुचाकी, दिघी आणि तळेगाव दाभाडे परिसरातून प्रत्येकी एक दुचाकी आणि चिखली परिसरातून एक टेम्पो चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत रविवारी (दि. 16) अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दररोज घडणाऱ्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

दिलीप किशनचंद जयभवानी (वय 50 रा. पिंपरी मार्केट, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिलीप यांनी त्यांची 25 हजार रुपये किमतीची मोपेड दुचाकी (एमएच 14 / डीडी 6113) 10 ऑगस्ट रोजी रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केली होती.

रात्री अज्ञात चोरट्यांनी दुचाकीचे लाॅक तोडून चोरून नेली. ही घटना 11 ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली.

पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

संदिपान विठ्ठल तेलंगी (वय 49 रा. वडमुखवाडी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदिपान यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची हिरो होंडा पॅशन प्रो दुचाकी (एमएच 02 / डीएच 663) 13 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता त्यांच्या घरासमोर पार्क केली.

भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार दुपारी पाच वाजता उघडकीस आला.
दिघी पोलीस तपास करीत आहेत.

संभाजी बाळासाहेब भोसले (वय 25, रा. शनिवार पेठ, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संभाजी यांनी त्यांची दहा हजार रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी (एमएच 14 / डीझेड 5431) 15 ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजता त्यांच्या घरासमोर पार्क केली.

रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 16 ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता उघडकीस आला.

तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

संदीप प्रकाश मोरे (वय 37, रा. कुदळवाडी, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदीप यांनी त्यांचा पाच लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा टेम्पो (एमएच 14 / जीडी 9045) 12 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता कुदळवाडी- चिखली येथे चिखली-पिंपरी रोडच्या कडेला पार्क केला होता.

अज्ञात चोरट्यांनी त्यांचा टेम्पो चोरून नेला. हा प्रकार 13 ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता उघडकीस आला.

चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.