Chinchwad : लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपला; अखेरच्या दिवशी प्रशासनाच्या नियमांचे पालन न करणाऱ्या 303 जणांवर कारवाई

The fourth phase of the lockdown is over; Action on 303 people who did not follow the rules of administration on the last day

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा रविवारी (दि. 31) संपला. सोमवार (दि. 1) पासून लॉकडाऊन पाच (अनलॉक 1) सुरू झाला आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याच्या शेवटच्या दिवशी पोलिसांनी प्रशानाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या 303 जणांवर कारवाई केली.

पिंपरी चिंचवड शहरात रविवारी 11 जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे रुग्ण इंदिरानगर, चिंचवड स्टेशन, भाटनगर, रुपीनगर, पिंपरी, बौध्दनगर, वाल्हेकरवाडी, दत्तनगर या भागातील आहेत. तर आनंदनगर, दिघी, खडकी, ताडीवाला रोड, आंबेगाव येथील रहिवासी असलेल्या 13 जणांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला.

यामुळे शहरात आजपर्यंत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा 522 वर पोहोचला आहे. आजवर शहरातील 8 तर शहराबाहेरील 12 रुग्णांचा पिंपरी चिंचवड शहरातील रुग्णालयांमध्ये मृत्यू झाला आहे.

रविवारी (दि. 31) पिंपरी चिंचवड पोलिसांनी पिंपरी चिंचवड शहरातील विविध पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

यामध्ये एमआयडीसी भोसरी (08), भोसरी (02), पिंपरी (43), चिंचवड (25), निगडी (03), आळंदी (04), चाकण (02), दिघी (29), म्हाळुंगे चौकी (00), सांगवी (11), वाकड (35), हिंजवडी (54), देहूरोड (37), तळेगाव दाभाडे (04), तळेगाव एमआयडीसी (04), चिखली (38), रावेत चौकी (04), शिरगाव चौकी (00) एकूण 303 जणांवर कारवाई केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.