Chinchwad : फसवणूक प्रकरणी बांधकाम व्यावसायिकासह तिघांवर गुन्हा दाखल

chinchwad Crime froud by Builders

एमपीसी न्यूज – करारनाम्याप्रमाणे जागा न देता त्या जागेची  परस्पर विक्री करण्यात आली. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकासह तीन जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही घटना 25 फेब्रुवारी 1998 ते 22 जुलै 2020 या कालावधीत धनंजय राजपार्क बिल्डींग, केशवनगर, चिंचवड येथे घडली.

मनोहर शंकर गावडे (वय 56, रा. केशवनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार  मे. एच. ए. डेव्हलपर्स नोंदणीकृत भागीदार संस्था रोझलॅंड रेसिडन्सी- पिंपळे सौदागर, रेश्‍मा सुनील चुगवानी (वय 50, रा. चुगवानी कुटीया, पिंपरी), विनोद प्रेमचंद चागवानी (वय 49, रा. डेअरी फार्म रोड, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गावडे यांनी आपली जागा विकसित करण्यासाठी आरोपींसोबत करारनामा केला होता. मात्र, आरोपींनी ठरल्याप्रमाणे फिर्यादी यांना जागा दिली नाही. तसेच त्या जागेची परस्पर विक्री केली.

सहायक निरीक्षक आर. आर. ठुबल तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.