Chinchwad : परस्पर खात्यावरून 80 हजार ट्रान्स्फर केल्याबाबत फसवणुकीचा गुन्हा

मपीसी न्यूज – खातेदाराच्या परस्पर त्याच्या खात्यावरून 80 हजार रुपये ट्रान्स्फर केल्याबाबत अज्ञातावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना विक्रम चेंबर्स, चिंचवड येथे घडली.

जयचंद विठ्ठलराव खंदाडे (वय 60, रा. सानेचौक, चिखली) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 ऑक्टोबर 2018 ते 3 ऑक्टोबर 2018 या कालावधीत ही घटना घडली आहे. अज्ञात व्यक्तीने फिर्यादी खंदाडे यांच्या बँक खात्यातून परस्पर 80 हजार रुपये अमित हिंदुराव पवार यांच्या बँक खात्यात जमा केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.