Chinchwad : सनातनच्या वतीने चिंचवडमधील 4 शाळांना सनातनच्या ग्रंथांचे विनामूल्य वितरण

एमपीसी न्यूज – ‘सनातन संस्थे’चा दृष्टीकोन केवळ व्यक्तीची (Chinchwad) पारमार्थिक उन्नती होण्यापुरता मर्यादित नाही. सनातनने व्यक्तीसह समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्कर्षाला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी अध्यात्मप्रसार करण्यासह समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती यांविषयी ‘सनातन संस्था’ विविध उपक्रम राबवते.  या अंतर्गत सनातन संस्थेच्या वतीने चिंचवड येथील अशोक संकपाळ यांच्या हस्ते पिंपरी चिंचवडमधील काही शाळांना सनातनचे ग्रंथ संच भेट देण्यात आले.

28 एप्रिल या दिवशी थेरगाव येथील लक्ष्मीबाई विद्यालय येथे शाळेचे मुख्याध्यापक पवार यांना तसेच आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या मातृसेवा विद्यामंदिर या शाळेच्या मुख्याध्यापिका नयना मावळे यांना ग्रंथ संच भेट देण्यात आला.

तसेच 29 एप्रिल या दिवशी चिंचवड येथील श्रीमती कोंडाबाई गोलांडे प्राथमिक विद्यालयात देखील संस्थेच्या वतीने ग्रंथ संच भेट देण्यात आले. शाळेच्या वतीने मुख्याध्यापिका स्वाती जोशी यांनी हे ग्रंथ स्वीकारले.

तसेच 1 मे या दिवशी मोरवाडी पिंपरी येथील रेणुकादेवी प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत देखील शाळेचे मुख्यध्यापक रजेंद्र तिखे सर यांना ग्रंथ संच भेट देण्यात आले. अभ्यास कसा करावा, गुण (Chinchwad) जोपासा आणि आदर्श बना, सुसंस्कार आणि चांगल्या सवयी, टी व्ही मोबालचे दुष्परिणाम, तसेच आयुर्वेदीक व प्रथमोपचार संबंधी माहिती असलेले ग्रंथ तसेच इतरही अनेक ग्रंथांचा या संचामध्ये समावेश आहे.

मुलांचा गुणात्मक तसेच सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने हे ग्रंथ अतिशय उपयुक्त आहेत. असे मत शाळेतील सर्व शिक्षकांनी व्यक्त करून संस्थेच्या या ग्रंथभेट उपक्रमाचे कौतुक केले.

Indrayani River : इंद्रायणी माता प्रदूषण मुक्तीसाठीचे साखळी उपोषण तिसऱ्या दिवशी सुरूच

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.