Chinchwad : अविनाश टेकवडे यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

एमपीसी न्यूज- अविनाश टेकवडे यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त स्टार हाॅस्पिटल, आकुर्डी यांच्या सहकार्याने तसेच अविनाशदादा टेकवडे मित्र परिवार व मोहिनी टेकवडे यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

मोहनगरमधील श्री तुळजा भवानी माता मंदिरात आयोजित केलेल्या शिबिराचा लाभ परिसरातील जेष्ठ नागरिक महिलांनी व शालेय विद्यार्थी यांनी ही घेतला .

कार्यक्रमाचे उदघाटन तुळजा भवानी विद्यालयाचे संचालक गणेश दातीर पाटील व जेष्ठ नागरीक संपत वीर यांनी केले. वेळी सामाजिक कार्यकर्ते युसूफभाई खान, अक्रम शेख, अजित शितोळे, राहुल दातीर, शकील शेख, अभिजीत वेंगुर्लेकर, प्रकाश कासट, अरूण शिंदे, तुषार वागलेकर, आश्विन अगरवाल, दत्ता वाघमोडे, सुरज मिर्गे, काका पवार, श्रीकांत पिल्ले व मित्र परिवार उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन शशिकांत भिलावरे, राजू खजिनदार, मंगेश थोरात , बंटी कांबळे, सोन्या बालघरे, आदेश केसवड, प्रशांत कु-हाडे, सुरज हराळे, गणेश महाजन, समीर सय्यद यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.