Chinchwad: शिवतेजनगर येथे शुक्रवारपर्यंत मोफत वैद्यकीय तपासणी, शिबिर

एमपीसी न्यूज – चिंचवड, शिवतेजनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान व भाग्यश्री चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये रविवारपासून मोफत शारीरिक तपासणी, व्यायाम शिबिर होत आहे. शुक्रवारपर्यंत हे शिबिर चालणार असून संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत तपासणी केली जात आहे.

वय वर्ष 50 पुढील नागरिकांना सतावणारे, मानदुखी, कंबरदुखी, स्नायू आखडणे, टोल जाणे , इत्यादी शारीरिक व्याधीवर वेग वेगळ्या प्रकारचे व्यायाम करून घेण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, भाग्यश्री चॅरीटेबल ट्रस्टच्या डॉ. स्वाती भिसे यांच्या हस्ते रविवारी शिबिराचे उद्घाटन झाले. ज्येष्ठ नागरिक संघाचे खजिनदार प्रकाश शिंदे, श्री स्वामी समर्थ महिला मंडळाच्या अध्यक्षा अर्चना तोंडकर, अंजली देव, अक्षदा देशपांडे, गाडे मावशी, पवार बाबा, श्रारण अवसेकर आदी पस्थित होते. सारिका रिकामे यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.