Chinchwad : प्रयास ग्रुपच्या वतीने जागतिक मातृदिनानिमित्त पाणी फौंडेशन अंतर्गत श्रमदान

एमपीसी न्यूज – १२ मे मदर्स डे हा दिवस. प्रयास ग्रुप महिलांचे खुले व्यासपीठ यांनी एका आगळ्यां वेगळ्या पध्दतींने साजरा केला. “काळी माती ही आपुली जिवन देणारी आई म्हणून तिच्यावर पिकणारी शेती, त्या शेतीसाठी लागणारे पाणी, यासाठी कृतज्ञता भावनेतून पाणी आडवा पाणी जिरवा, शोषखड्डे खनने, शेतचारी काढणे, शेततळे बांधणे या माध्यमातून पाण्याचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने ‘शहर व गावातील दरी भरून काढण्यासाठी एक व्यासपीठ उभारुन त्याच्या माध्यमांतून श्रमदान साकार व्हावे. यासाठी बारामती तालुक्यातील नारोळी गावात चिंचवड येथील प्रयास ग्रुपच्या वतीने एकदिवसीय श्रमदान केले.

यावेळी नारोळी गावाला दुष्काळमुक्त करण्यासाठी चारी खणणे, माती भराव टाकणे आदी कामे ग्रुपच्या वतीने करण्यात आली. यावेळी ग्रुपच्या अध्यक्षा शोभा निसळ यांनी दुष्काळाचे आव्हान पेलण्यासाठी दुष्काळ विरोधी चळवळ निर्माण करणे गरजेचे असून त्यासाठी शहर व गाव या दोघामध्ये दुवा बनून आज नारोळी गावाला मशिन खरेदीसाठी आर्थिक मदतीचा हात व श्रमशक्तीचे दान येथे करीत आहोत.

  • श्रमदानासाठी पाणी फाऊंडेशनच्या सहाय्यक निलम पंडीत, ग्रामपंचायत सरपंच पुष्पा ढमाले, विकास पोमण व स्थानिक गावकरी यांचे विशेष सहाय्य लाभले.

श्रमदान व कार्यक्रम संपन्नतेसाठी ग्रुप सदस्या सुनिता किवडें, स्वाती जोशी, शोभा मिरजकर, जयश्री पाटील आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन माधुरी कवी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.