Chinchwad : भारतीय जैन संघटनेतर्फ रुग्णांना फळवाटप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड जैन भारतीय जैन संघटना पिंपरी-चिंचवड विभागाच्या वतीने तालेरा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करण्यात आले.

यावेळी भारतीय जैन संघटनेचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष विरेश छाजेड, माजी अध्यक्ष संदेश गादिया, उपाध्यक्ष शुभम कटारिया, सतीश मेहेर, प्रशील ताथेड, मनोज बलदोटा, नयन शहा, लिना कटारिया, निलेश सोळंकी आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमास जैन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोक पगारिया, कार्याघ्यक्ष सुरेश गादिया, महासंघाचे अध्य्क्ष वीरेंद्र जैन यांच्या हस्ते फळ व बिस्कीट वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन तालेरा रुग्णालय प्रशासनाचे विशेष सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.