Chinchwad : गुरुकुलम् मधील विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ आणि साहित्य फराळची भेट

एमपीसी न्यूज : – दिलासा साहित्य सेवा संघाच्या व्हॉट्सअॅप समूहावरील (Chinchwad) साहित्यिकांनी चिंचवड गावातील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् मधील विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ आणि साहित्य फराळ वितरण तसेच गुरुकुलम् साठी 56 खुर्च्या प्रदान केल्या आहेत.

कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले, डॉ. पी. एस. आगरवाल, शोभा जोशी, कैलास भैरट, सुभाष चव्हाण, दिलासाचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी सर्व समूहाच्या वतीने पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्याकडे ही मदत सुपुर्द केली. यावेळी उपक्रमात सहभागी असलेल्या नंदकुमार मुरडे, राधाबाई वाघमारे, अशोकमहाराज गोरे, नीलेश शेंबेकर, मुरलीधर दळवी, योगिता कोठेकर, सुहास घुमरे, जयश्री श्रीखंडे, मानसी चिटणीस, बाजीराव सातपुते, बाळकृष्ण अमृतकर या साहित्यिकांची सभागृहात उपस्थिती होती.

PCMC : पर्यावरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अकार्यक्षम आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांना पदमुक्त करा; पीएम, सीएमला पत्र

याप्रसंगी श्रीकांत चौगुले यांनी आपल्या मनोगतातून, समाजाच्या मुख्य प्रवाहाच्या बाहेर असलेल्या भटक्याविमुक्त विद्यार्थ्यांसाठी फूल ना फुलाची पाकळी म्हणून मदत देताना समाजऋणातून अंशतः उतराई होण्याचे समाधान साहित्यिकांना लाभले आहे!” अशी भावना व्यक्त केली.

पुस्तकांचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. उपक्रमात सहभागी साहित्यिकांच्या यादीचे वाचन केले. यावेळी (Chinchwad) गुरुकुलम् मधील विद्यार्थ्यांसोबत साहित्यिकांनी फराळाचा आस्वाद घेतला. तसेच शंकर पवार, शामराव सरकाळे, शोभा जोशी, शाहीर आसराम कसबे यांनी मुलांच्या मनोरंजनासाठी बालगीते, कविता आणि शाहिरी कवनांचे सादरीकरण केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. सुभाष चव्हाण यांनी आभार मानले.

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share