Chinchwad : मोबाईल नंबर दिला नाही म्हणून तरुणीला सिमेंटच्या गट्टूने मारहाण

एमपीसी न्यूज – मोबाईल नंबर मागितल्यानंतर तो देण्यास नकार दिला (Chinchwad ) म्हणून तरुणाने थेट तरुणीच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालत मारहाण केली आहे. हा प्रकार रविवारी (दि.21) चिंचवड येथे लिंकरोडवर घडला आहे.

याप्रकरणी पीडितेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून शारुख हुसेन शेख (वय 30 रा. चिंचवड) याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

PCMC : “यूपीएससी” उमेदवारांना परीक्षेसाठी मिळणार वेळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या शेजारच्या बिल्डींगमध्ये आरोपी राहतो. त्याने फिर्य़ादीला मोबाईल नंबर मागितला यावेळी फिर्यादीने त्याला नकार दिला. याचा राग येऊन आरोपीने फिर्यादीला हातातील सिमेंट ब्लॉक ने डोक्यात मारून जखमी केले.तसेच शिवीगाळ करत धमकी दिली. यावरून चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत (Chinchwad ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.