Chinchwad : राज्य ग्राहक संरक्षण परिषदेवर गोविंद पानसरे यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा औद्योगिक विकास मंडळाचे अध्यक्ष तसेच जागतिक मराठी चेंबर कॉमर्स ॲण्ड इंडस्टीज पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष गोविंद पानसरे यांची महाराष्ट्र शासनाने ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 नुसार अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या ‘राज्य ग्राहक संरक्षण परिषदे’ वर उद्योग प्रतिनिधी वर्गातून सदस्य पदावर नियुक्ती केली आहे. तसेच राजपत्र महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 – अ, गुरुवार (दि. 20 जून 2019), असाधारण क्र. 155 मध्ये अधिसूचना प्रसिध्द केली आहे.

तसेच गोविंद पानसरे यांची महाराष्ट्र शासन राजपत्राव्दारे ‘विशेष कार्यकारी अधिकारी’ पदावर पाच वर्षांसाठी नियुक्ती केली आहे. पानसरे हे पिंपरी चिंचवड फेडरेशन ऑफ असोशिएशन्सच्या कार्याध्यक्षापदावर कार्यरत आहेत.

  • तसेच पिंपरी चिंचंवड लघू उद्योजक विकास समितीचे अध्यक्ष, पिंपरी चिंचवड हॉटेल ॲण्ड रेस्टॉरंट असोशिएशन, पिंपरी चिंचवड प्लास्टिक असोशिएशन, महाराष्ट्र इकॉनॉमिक कौन्सिल, मुंबई, इंडियन फायनान्सीएल प्रोफेशनल असोशिएशन, जिल्हास्तरीय बॅंकर्स कमिटी, उद्योगसेतू या संस्थांवर विविध पदांवर काम करीत आहेत. पिंपरी चिंचवड फेडरेशन ऑफ असोशिएशनने गोविंद पानसरे यांचे नियुक्तीबदल अभिनंदन केले आहे.
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like