Chinchwad: ‘कण्हेरीची फुले’ कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद

एमपीसी न्यूज – रेझोनन्स स्टुडिओ आणि थिएटर वर्कशॉप कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कण्हेरीची फुले’ हा कार्यक्रम चिंचवडच्या पैस रंगमंच येथे सादर करण्यात आला. संगीतकार तेजस चव्हाण यांच्या संगीत रचनांच्या गाण्यांचा समावेश या कार्यक्रमात होता. ‘कण्हेरीची फुले’ या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला.

तेजस चव्हाण, प्रिती चव्हाण या कलाकारांनी गायन केले. तर आकाश मोरे यांनी कलाकारांना साथ दिली. कार्यक्रमात क्लासिकल ते रॉक संगीतांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या गीतांचा कार्यक्रमात समावेश होता. कार्यक्रमात मराठी, हिंदी, राजस्थानी, मल्याळम गाण्याचा प्रेक्षकांना आस्वाद घेता आला.

कार्यक्रमाचे संयोजन प्रभाकर पवार, बी. महांतेश्वर, दुर्वाक्षी भोसगे यांनी केले. अतुल पंढरपुरे यांनी ध्वनीसंयोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता गव्हाणे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.