Chinchwad : क्रांतीवीर चापेकर बंधुच्या 121 व्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन

एमपीसी न्यूज – क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या 121 वा स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.यानिमित्त ढोल-ताशे लेझीमच्या गजर करण्यात आला.   राष्ट्रकार्यासाठी एकाच घरातील तीन बंधूंनी भारतमातेसाठी आपले बलिदान दिले त्यांना अभिवादन करण्यासाठी अभिवादन फेरीची सुरुवात क्रांतिवीर चापेकर विद्यामंदिर चिंचवड च्या प्रांगणातील दामोदर हरी चापेकर यांच्या प्रतिमेस क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, कार्यवाह अॅड सतिश गोरडे यांच्या हस्ते हार घालून झाली.
या अभिवादन फेरीत पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् चे विद्यार्थी, क्रांतिवीर चापेकर विद्यामंदिर व विद्यालयाचे विद्यार्थी, लोकमान्य टिळक विद्यालय व खिंवसरा पाटील विद्यामंदिर थेरगाव येथील विद्यार्थी व सर्व शाळेतील शिक्षक सामील झाले होते. यामध्ये ढोल ताशे पथक, विद्यार्थिनींचे लेझीम पथक, बर्ची डान्स, पारंपारिक वेशभूषा केलेले विद्यार्थी, तसेच सजवलेल्या टेम्पोमध्ये दामोदर हरी चापेकर, वासुदेव हरी चापेकर, बाळकृष्ण हरी चापेकर, शिवाजी महाराज व मोरया गोसावी यांची वेशभूषा केलेले विद्यार्थी उभे होते. या फेरीत विद्यार्थ्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम, चापेकर बंधूंचा विजय असो अशा घोषणा दिल्या त्याचबरोबर पर्यावरणाचे संरक्षण करा, झाडे लावा, पाणी आडवा- पाणी जिरवा, 100 टक्के मतदान करा असेही संदेश या अभिवादन फेरीद्वारे समाजाला  देण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला.
  •  ही अभिवादन फेरी संपूर्ण चिंचवड गावातून काढण्यात आली.  चापेकर चौकातील दामोदर, बाळकृष्ण वासुदेव चापेकर व महादेव रानडे यांच्या पुतळ्यास हार घालून चापेकर बंधूंच्या राहत्या वाड्यापर्यंत काढण्यात आली.
यावेळी  प्रमुख वक्ते प्रसिद्ध व्याख्याते नारायणराव देशपांडे, पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनचे मा अध्यक्ष अॅड  राजेशजी पुणेकर, उद्योजक  धर्मेंद्र दुबे, इंडिया सॉफ्टटेक टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांचे  सीईओ  सुनील चोरे, समितीचे कार्यवाह अॅड. सतिश गोरडे, अध्यक्ष गिरीशजी प्रभुणे, कोषाध्यक्ष संजय कुलकर्णी, सदस्य अशोक पारखी, गतीराम भोईर, आसाराम कसबे, नीता मोहिते, शामराव उदास, मधुसूदन जाधव, राजेंद सराफ, अॅड अनिल शिंदे, अॅड दिपाली गाडे, व्यवस्थापक सिद्धेश्वर इंगळे, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्च्या प्राचार्या पुनम गुजर, मुख्याध्यापिका वासंती  तिकोणे, मुख्याध्यापक जगन्नाथ देविकर, मुख्याध्यापक नटराज जगताप, मुख्याध्यापिका अश्विनी बाविस्कर आदी  उपस्थित होते.
क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, चापेकर बंधूंच्या या वाड्याचे जतन व जपणूक करण्याचे काम आमची समिती करत आहे. याठिकाणी राष्ट्रीय संग्रहालय उभे होणार आहे त्यासाठी पिंपरी चिंचवड म.न.पा. ने खूप सहकार्य केले आहे.

  • चापेकर बंधूंचा इतिहास वर्णन करणारा, रँडचा वध का व कसा केला याचे वर्णन करणारा, शौर्य रसाने रोमांच उभे करणारा आसारामजी कसबे यांनी रचलेला पोवाडा बालशाहीर सिद्धेश केसकर व त्याचे सहकारी यांनी सादर केला. क्रांतिवीर चापेकर विद्यामंदिर मधील शिक्षकांनी काव्यलेखन तंत्राचे प्रशिक्षण घेतले व शाळेतील विद्यार्थ्यांना सुद्धा दिले. या शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी मिळून आरोग्य, देशभक्ती, पुलवामा हल्ला, शाळा, निसर्ग इत्यादी अनेक विषयांवर स्वरचित काव्यसंग्रह तयार केला  या काव्यसंग्रहाचे प्रकाशन यावेळी पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
क्रांतिवीर चापेकर समितीचे कार्यवाह अॅड  सतिश गोरडे यांनी जनजागृती करणाऱ्या प्रबोधन मंचाची माहिती देत देशहितासाठी शंभर टक्के मतदान करा.* स्वतः करा, मित्रांना, नातेवाईकांना सांगा  तरच योग्य नेता निवडून येईल. नोटा चा वापर करू नका. असे सांगून मतदानाचा हक्क बजावण्याचे महत्त्व पटवून दिले.
  • प्रमुख वक्ते नारायणराव देशपांडे यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की, स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यासाठी व क्रांतिकारकांना अभिवादन करण्यासाठी आपण राष्ट्रासाठी तन-मन-धनाने झटले पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने आपण क्रांतिकारकांना श्रद्धांजली वाहिली असे म्हणता येईल.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संयोजनात अतुल आडे,शुभदा साठे,दादासाहेब खेडकर या शिक्षकेतर कर्मचार्‍यांनीही सहभाग  घेतला.
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक गिरीश प्रभुणे यांनी  केले.  सूत्रसंचालन स्मिता जोशी यांनी केले व आभार अशोक पारखी यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.