Chinchwad : शिवजयंती उत्सव समितीतर्फे छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – चिंचवडमधील शिवजयंती उत्सव समितीतर्फे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. चिंचवडमधील बर्ड व्हॅली उद्यानातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी माजी महापौर मंगला कदम, माजी नगरसेवक मारुती भापकर, युवानेते कुशाग्र कदम, आकाश देशमुख, जीवन बो-हाडे, सतीश काळे आदी उपस्थित होते.

  • छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रम घेण्यात आले. पुष्पहार अर्पण करून, मानवंदना देऊन, ढोल-ताशांच्या गजरात, सामाजिक उपक्रम राबवून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.

शिवजयंती उत्सव समितीतर्फे जयंतीच्या पूर्वसंध्येला दीपोत्सव, मशाल ज्योत आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2