Chinchwad : कार्यक्रमाच्या हॉलमधून अडीच लाखांचा ऐवज लंपास; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – कार्यक्रमासाठी गेलेल्या महिलेची पर्स अज्ञात चोरट्याने पळवली. त्यामध्ये सोन्याचे दागिने आणि मोबाईल फोन असा एकूण 2 लाख 43 हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 20) रात्री साडेनऊच्या सुमारास वाल्हेकरवाडी येथील शुभम गार्डन येथे घडली.

कविता विनय यन्नुवार (वय 45, रा. औंध रोड, बोपोडी) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास फिर्यादी कविता कार्यक्रमानिमित्त वाल्हेकरवाडी येथील शुभम गार्डन येथे गेल्या होत्या. कार्यक्रमाच्या स्टेजवर असताना त्यांनी त्यांची पर्स बाजूला ठेवली.

अज्ञात चोरट्याने ती पर्स चोरून नेली. पर्समध्ये सोन्याचे दागिने, मोबाईल फोन आणि कागदपत्रे असा एकूण 2 लाख 43 हजार रुपयांचा ऐवज होता. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.