Chinchwad : माहेरहून मोटारसायकल, पैशांची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – माहेरहून मोटारसायकल आणि दोन लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी पती, सासू, नणंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना लिंकरोड चिंचवडगाव येथे 2015 ते 2017 या कालावधीत घडली.

पती महेंद्र नारायण कदम (वय 32), सुवर्णा नारायण कदम (वय 56), नणंद उर्मिला दिनेश मोरे (वय 35) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 26 वर्षीय विवाहितेने चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला.
  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2015 ते 2017 या कालावधीत आरोपींनी पीडित विवाहितेकडे माहेरहून टीव्हीएस वीगो मोटारसायकल व दोन लाख रुपये आणण्याची मागणी केली. तसेच आरोपींनी विवाहितेला वेळोवेळी शारीरिक व मानसिक त्रास दिला. ‘माझा भाऊ कसा आहे ते तुला माहित नाही का?’ अशी नणंदेने धमकी दिली. याबाबत विवाहितेने पोलीस धाव घेत गुन्हा नोंदवला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.