Chinchwad : विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरणाऱ्या पत्नीचा छळ; पती आणि सासूवर गुन्हा

एमपीसी न्यूज – विवाहबाह्य संबंधास विरोध करणाऱ्या तसेच कौटुंबिक कारणावरून विवाहितेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी पती व सासूच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना अण्णा भाऊ साठेनगर, रामटेकडी हडपसर येथे घडली.

पती विशाल मधुकर सोनावणे, सासू लता मधुकर सोनावणे (दोघेही रा. रामटेकडी, हडपसर, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी 27 वर्षीय विवाहितेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 25 फेब्रुवारी 2018 पासून वेळोवेळी हडपसर येथे घडली आहे. पतीचे एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंध आहेत. या संबंधात विरोधात केल्याच्या कारणावरून पतीने विवाहितेचा छळ केला. तसेच वेळोवेळी कौटुंबिक कारणावरूनही पती आणि सासूने आपसांत संगनमत करून शाररीक व मानसिक छळ केला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.