Chinchwad: आदित्य बिर्ला रुग्णालय प्रशासनाकडून मानसिक त्रास; स्टाफनर्स, आरोग्य सेवकांचा गंभीर आरोप

Chinchwad: Harassment of staff from Aditya Birla Hospital administration; Serious allegations of health workers कोरोनात करत असलेल्या कामामुळे या महिन्यात वेतनात वाढ करण्याचे आश्वासन व्यवस्थापनाने दिले होते. पण, वेतन वाढले नाही.

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील आदित्य बिर्ला रुग्णालय प्रशासनाकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप रुग्णालयातील आरोग्यसेविका, सेवकांनी केला आहे. तसेच बाऊंसरच्या माध्यमातून धमकाविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचाही आरोप करत कर्मचाऱ्यांनी याविरोधात आज (दि.6) रुग्णालयाबाहेर धरणे आंदोलन सुरु केले आहे. भर पावसात हे आंदोलन सुरु आहे.

आरोग्यसेविका, सेवकांवर अन्याय केला जाते आहे. जेवण निकृष्ट दर्जाचे दिले जाते. ते देखील वेळेवर मिळत नाही. त्यामुळे स्टाफनर्स काम करण्यासाठी इच्छुक नाहीत.

दरम्यान, याबाबत रुग्णालयाची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता व्यवस्थापनाशी संपर्क होऊ शकला नाही. प्रतिक्रिया प्राप्त होताच त्याची माहिती या वृत्तात पुन्हा दिली जाईल.

कोरोनात करत असलेल्या कामामुळे या महिन्यात वेतनात वाढ करण्याचे आश्वासन व्यवस्थापनाने दिले होते. पण, वेतन वाढले नाही. स्टाफ कमी आहे. नर्स नसताना त्यांचे कपडे  हाऊसकिपिंग कर्मचा-यांना दिले जातात आणि नर्स म्हणून ते रुग्णालयात फिरतात असा धक्कादायक आरोपही करण्यात आला आहे.

यामुळे रुग्ण, रुग्णाच्या नातेवाईकाला ते नर्स असल्याचेच वाटत होते. आम्हाला दिली जाणारी कपडे व्यवस्थित दिली जात नाही. रोटेशन व्यवस्थित नाही. वाढीव वेतन दिले नाही, असे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

रुग्णसेविका, रुग्णसेवकावर प्रचंड अन्याय होत आहे. कोविड रुग्णालयात सहा तासच ड्युटी करण्याचा निर्णय आहे. पण, आम्हाला सात-सात, 12-12 तास ड्युटी करावी लागत आहे. यामुळे ताण येत आहे. राजीनामा दिला तरी चालेल असे सांगतात.

स्टाफ, बाऊंसरच्या माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, असाही आरोप केला. या कर्मचाऱ्यांनी दिवसभर आंदोलन करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.