Chinchwad : पिंपरी चिंचवड शहरात एटीएम फोडणारी हरियाणातील टोळी वाकड पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – स्थानिक तरुणांच्या मदतीने हरियाणामधून येऊन महाराष्ट्रात एटीएम फोडणाऱ्या एका टोळीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एटीएम फोडीचे आठ गुन्हे उघडकीस आले असून चोरट्यांकडून तीन लाखांची रोकड, तीन कार, दुचाकी असा सुमारे 20 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

झरुद्दीन ताहीर हुसेन (वय 29, रा. टोंका, पलवन, हरियाणा), सरफुद्दीन हसीम (वय 22, रा. हरियाणा), मोहमद शकिर हसन (वय 35, रा. हरियाणा), संदीप माणिक साळवे (वय 43, रा. जांभे, ता. मुळशी, पुणे), दत्तात्रय रघुनाथ कोकाटे (वय 42, रा. थेरगाव, पुणे), गौतम किसन जाधव (वय 38, रा. थेरगाव, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत

एटीएम हेरण्याचा अनोखा फंडा
एटीएममध्ये पैसे भरताना ते विशिष्ट दोऱ्याने बांधून आणले जातात. नोटांच्या बंडलला बांधलेला दोरा एटीएममधील कचराकुंडीत दिसला की समजायचं आत्ताच कॅश भरली. मग, ते एटीएम फोडायचं, असा त्यांचा प्लॅन होत असे. काळेवाडी येथील एटीएम फोडण्यापूर्वी चोरट्यांनी संपूर्ण पिंपरी चिंचवड परिसर पालथा घातला होता. काळेवाडी येथील एका एटीएममधील कचराकुंडीत चोरट्यांना नोटांना लावला जाणारा विशिष्ट दोरा आढळून आला. त्यानंतर चोरट्यांनी काळेवाडी येथे एटीएम फोडले.

_MPC_DIR_MPU_II

दिल्ली विमानतळावर एकाला अटक
पिंपरी चिंचवडमधून अटक केलेल्या आरोपींना हरियाणामधील मुख्य आरोपीने फोन केला की पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ‘तू अंडरग्राऊंड हो.’ आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्याने वाकड पोलिसांनी आरोपीचा डाव त्याच्यावरच उलटवण्याचा प्लॅन केला. आरोपीसह वाकड पोलिसांचे एक पथक तात्काळ दिल्लीला रवाना झाले. दिल्ली विमानतळावर मुख्य आरोपीला घेण्यासाठी बोलावले. मुख्य आरोपी विमानतळावर आला अन् अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

एटीएम फोडण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर चोरट्यांसाठी सुरक्षित
हरियाणा येथील टोळीला पिंपरी चिंचवड शहरात एटीएम फोडण्यासाठी सुरक्षित वातावरण होते. कारण, या टोळीला शहरातील स्थानिक आरोपींची मदत मिळत असे. स्थानिक आरोपी चोरट्यांनी गॅस कटर, गॅस, रस्त्यांची माहिती, शहरातील विविध ठिकाणांची माहिती पुरवत असत. त्यामुळे मुख्य आरोपी प्रथम शहरात यायचा. स्थानिक आरोपींच्या मदतीने तो एटीएम सेंटरची पाहणी करायचा. एटीएम फिक्स झाल्यानंतर टोळीतील इतर सदस्यांना हरियाणातून बोलावणे धाडायचा.

वाकड पोलीस ठाण्यातील तपास पथकाला आयुक्तांकडून बक्षीस
वाकड पोलिसांच्या तपास पथकाने मोठी कारवाई केली आहे. या डिटेक्शनच्या टीमचे राज्यातील बेस्ट डिटेक्शनसाठी सादर केले जाणार आहे, असे सांगत पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी वाकड पोलिसांच्या पथकाला 50 हजारांचे बक्षीस जाहीर केले.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने, उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर, पोलीस कर्मचारी बापूसाहेब धुमाळ, नितीन ढोरजे, बिभीषण कन्हेरकर, जावेद पठाण, प्रमोद भांडवलकर, रमेश गायकवाड, सुरेश भोसले, विक्रम जगदाळे, प्रमोद कदम, विक्रम कुदळ, विजय गंभीरे, दीपक भोसले, सचिन नरुटे, शाम बाबा, नितीन गेंगजे, प्रशांत गिलबिले, तात्यासाहेब शिंदे, सुरज सुतार, नूतन कोंडे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.