Chinchwad: पोलीस फ्रेन्डस वेलफेअर असोसिएशनतर्फे पोलिसांसाठी आरोग्य शिबिर

एमपीसी न्यूज – स्वत:च्या कुटुंबापेक्षाही समाजाच्या सुरक्षेला प्राधान्य देणाऱ्या पोलिसांसाठी पोलीस फ्रेन्डस वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. हे शिबिर चिंचवड पोलीस ठाण्यात घेण्यात आले.

चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमराव शिंगाडे, चिंचवड वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खंडेराव खैरे, एपीआय रोहिणी शेवाळे, पोलीस अधिकारी, तसेच भाजप मंडल अध्यक्ष योगेश चिंचवडे, पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष गजानन चिंचवडे, पुणे जिल्हा अध्यक्ष निखिल येवले, उपाध्यक्ष सचिन लाड, संघटक विनेश भोजे, हवेली तालुका अध्यक्ष सागर पाचार्णे, कार्याध्यक्ष अमेय देशपांडे, सागर पुंडे, गणेश पाटील, रवी पानसरे, प्रणव बुर्डे, उमेद सुथार, केशव त्रिभुवन,पांडुरंग गणगे, विशाल संपूर्ण आरोग्य संस्थेचे अध्यक्ष विशाल गुरव, डाॅ के.डी.एम. वाडिया, डॉ. वैशाली मंडल, विनोद वाघमारे, शुभांगी सरोटे आदी उपस्थित होते.

गजानन चिंचवडे यांनी सांगितले, पोलिसांना ठरवून दिलेल्या जागी दिवसभर काम करावे लागत असल्याने, त्यांना प्रदूषण आणि त्याच्या जोडीला येणार्‍या आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. या दृष्टीने हे आरोग्य शिबिर घेण्यात आले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमराव शिंगाडे यांनी पोलीस फ्रेंडस् वेलफेअर असोसिएशन पोलिसांसाठी करत असलेल्या कामाचे कौतुक केले. ही संस्था पोलिसांप्रती एक सामाजिक बांधिलकी या नात्याने पोलिसांचे आरोग्य तपासणी शिबिर घेऊन एक चांगला संदेश समाजासमोर ठेवत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.