Chinchwad: मोफत आरोग्य तपासणी शिबिर

एमपीसी न्यूज – श्री दत्त जयंतीनिमित्त आदित्य बिर्ला हॉस्पिटल आणि मोरया क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शुक्रवारी (दि.21) मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे.

चिंचवड, मोहनगर येथील श्री दत्त मंदिर चौक येथे हे कार्यक्रम होणार आहेत. शुक्रवारी (दि.21) 45 वर्षापुढील नागरिकांची मधुमेह तपासणी केली जाणार आहे. सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत आरोग्य तपासणी केली जाणार आहे.

सायंकाळी चार वाजता सिद्धीविनायक भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर ओमकार बालसंस्कार वर्ग होणार आहे. शनिवारी (दि.22)दत्तात्रय होम होणार आहे. सायंकाळी दत्त जयंती साजरी करण्यात येणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप होणार आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.