Chinchwad : सांगली अर्बन बॅकेच्या वर्धापनदिनामित्त स्वच्छता अभियानसह आरोग्य तपासणी

एमपीसी न्यूज – सांगली अर्बन बॅकेच्या वर्धापनदिनामित्त चिंचवड शाखेच्या वतीने दि. 12 फेब्रुवारीला स्वच्छता अभियान आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सांगली अर्बन बँक यंदा 85 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यास सभासद आणि खातेदार यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आरोग्य शिबिरात ४५ जणांचा सहभाग घेतला.

बॅकेचे चिंचवड शाखेचे शाखाधिकारी अवधुत नाईक, उपशाखाधिकारी रामचंद्र दप्तरदार, बॅकेचे सेवक राजेंद्र गुंजाळ, भारती वंडेकर, यलण्णा हातगुंदे तसेच शाखेचे स्थानिक सल्लागार औदुंबर नाईक यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम करण्यात आला. चिंचवड येथील डोके उद्यान परिसरात सकाळी 7 ते 9 या वेळेत स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर 10 ते 2 आरोग्य शिबीर घेण्यात आले.

या आरोग्य शिबिरात यात 45 जणाची तपासणी करण्यात आली. यासाठी मोरया हॉस्पीटल चिंचवड यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच पिंपरी-चिंचवड मनपा अधिकारी यांनी स्वच्छता मोहिमेसाठी सहकार्य केले, असे शाखाधिकारी अवधुत नाईक यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.