BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : आंतरराष्ट्रीय रिदमीक जिमनॅस्टिकमध्ये हेवन स्पोर्ट क्लबच्या खेळाडूंचे यश

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- हैदराबाद येथे झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय रिदमीक जिमनॅस्टिक या क्रिडा प्रकारात पिंपरी-चिंचवड मधील हेवन स्पोर्ट क्लबच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली.

अनुष्का लुणावत हिने रौप्यपदक तर अनन्या देव हिने कांस्यपदक मिळवून पिंपरी-चिंचवडचे नाव रिदमीक जिमनॅस्टिकमध्ये नावारूपाला आणले.
या स्पर्धेत मैत्रेयी क्षीरसागर हिने 12 वर्षाच्या आतील गटात १० वी श्रेणी तर अनन्या देव 6.15 गुण प्राप्त करीत 16 वी प्राप्त केली. 10 वर्षाच्या आतील वयोगटात भार्गवी विपट हिने 5.65 गुण प्राप्त करीत 17 वी तर अनुष्का लुणावत हिने 5.03 गुण घेऊन २० वी श्रेणी प्राप्त केली.

या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक हर्षद कुलकर्णी व राष्ट्रीय खेळाडू धनश्री देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. पिंपरी-चिंचवड अध्यक्ष संजय मंगोडेकर उपाध्यक्ष अलका तापकीर यांनी खेळाडूंचे कौतुक केले.

HB_POST_END_FTR-A2

.