Chinchwad : पालखी सोहळ्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त

पोलिसांच्या सूक्ष्म निगराणीत तुकोबा, ज्ञानोबांची पालखी होणार मार्गस्थ

एमपीसी न्यूज – आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज (Chinchwad) आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहेत. आळंदी आणि देहू ही दोन्ही तीर्थक्षेत्रे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आहेत. पालखी सोहळा सुरक्षित पार पडण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सूक्ष्म नियोजन केले आहे. पालखी सोहळ्यासाठी चार हजार 528 अधिकारी आणि अंमलदार तसेच एसआरपीएफच्या तीन तुकड्या, एनडीआरएफच्या चार तुकड्या असा भलामोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी विविध उपाययोजना देखील केल्या आहेत.

संत तुकाराम महाराज पालखी 10 जून रोजी देहूगाव येथून प्रस्थान ठेवणार आहे. पालखीचा पहिला मुक्काम देहूगाव येथील इनामदार वाड्यात होणार आहे. त्यानंतर 11 जून रोजी तुकोबांची पालखी देहूगाव येथून आकुर्डीकडे प्रस्थान करेल. पालखीचा 11 जून रोजीचा मुक्काम आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात असेल. याच दिवशी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी येथून प्रस्थान ठेवेल. तिचा 11 जून रोजीचा मुक्काम गांधीवाडा आळंदी येथे असेल. त्यानंतर 12 जून रोजी दोन्ही पालख्या पुणे शहराकडे प्रस्थान करणार आहेत.

पालखी सोहळ्यावर तीन अत्याधुनिक सर्व्हेलन्स व्हेईकल करडी नजर ठेवणार आहेत. पालखी मार्गावर 345 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून चार ड्रोन कॅमेरे निगराणी करणार आहेत. बॉम्ब शोधक नाशक पथकाच्या चार टीम असणार आहेत. महिला वारकरी आणि पालखीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या महिलांच्या छेडछाडीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी दोन पथके तयार केली आहेत. तसेच सोनसाखळी चोरीच्या घटना रोखण्यासाठी 12 पथके तयार केली आहेत. नागरिकांसाठी 39 ठिकाणी सूचना फलक लावले आहेत. महत्वाच्या चार ठिकाणी पोलीस मदत केंद्र तर चार ठिकाणी महिलांच्या संरक्षणासाठी दामिनी पथके असतील.

वारकऱ्यांच्या वाहनांसाठी पासेसची व्यवस्था पोलिसांकडून करण्यात आली आहे. आठ व्हिडीओग्राफी कॅमेरे, चार सीसीटीव्ही, ड्रोन निगराणी पथके असतील. एक हेल्प डेस्क असेल. नागरिकांना कोणतीही अडचण आल्यास या हेल्प डेस्कची मदत घेता येईल. दोन्ही पालखी मार्गांवर 20 ठिकाणी वॉच टॉवर उभारण्यात आले आहेत. पालखी मार्गावरील इतर वाहतूक पूर्णपणे वळवली आहे. आळंदी येथे सात तर देहू येथे 30 डायव्हर्जन देण्यात आले आहेत.

पोलीस आयुक्तालयातून लावण्यात आलेला बंदोबस्त –

पोलीस उपायुक्त – 3
सहायक पोलीस आयुक्त – 8
पोलीस निरीक्षक – 39
सहायक निरीक्षक/ उपनिरीक्षक – 160
पोलीस अंमलदार – 1822
क्यूआरटी – 1 (18 अंमलदार)
आरसीपी – 5 (200 अंमलदार)
स्ट्रायकिंग – 10 (100 अंमलदार)

वाहतुकीसाठी लावलेला पोलीस बंदोबस्त – Chinchwad

पोलीस उपायुक्त – 1
सहायक पोलीस आयुक्त – 1
पोलीस निरीक्षक – 12
सहायक निरीक्षक / उपनिरीक्षक – 15
पोलीस अंमलदार – 339
वॉर्डन – 150

बाहेरून मागवलेला पोलीस बंदोबस्त –

पोलीस उपायुक्त – 1
सहायक पोलीस आयुक्त – 4
पोलीस निरीक्षक – 10
सहायक निरीक्षक / उपनिरीक्षक – 45
पोलीस अंमलदार – 800
एसआरपीएफ – 3 कंपनी
एनडीआरएफ – 4 टीम
होमगार्ड – 800

Yerawada : येरवडा कारागृहात 13 जून रोजी होणार अभंग स्पर्धेची महाअंतिम फेरी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.