Chinchwad : आगीमध्ये सर्वस्व गमावलेल्या कुटुंबाना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला सदस्यांचा मदतीचा हात

एमपीसी न्यूज – दळवीनगर भागामध्ये लागलेल्या भीषण आगीमध्ये सर्वस्व गमावलेल्या कुटुंबाना राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा वैशाली काळभोर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मदतीचा हात दिला आहे. घटनास्थळी धाव घेत या कुटुंबाना जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. या आगीमध्ये दोन जणांना आपला जीव गमवावा लागला होता.

_MPC_DIR_MPU_II

सर्व महिला कार्यकर्त्यांनी घरातील जुने कपडे, भांडी, धान्य, भाजीपाला आणि इतर वस्तू या गरजू कुटुंबाला दिल्या. तसेच या ठिकाणी खंडित करण्यात आलेला वीजपुरवठा पूर्ववत करून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. ‘अ’ प्रभाग कार्यालयात ठराव मंजूर करून या कुटुंबाना घरे बांधून किंवा आर्थिक मदत मिळण्यासंदर्भात प्रयत्न करणार असल्याचे वैशाली काळभोर यांनी सांगितले.

यावेळी महिला कार्यध्यक्षा पुष्पा शेळके, भोसरी विधानसभा अध्यक्षा मनीषा गटकळ, चिंचवड विधानसभा कार्याध्यक्षा पौर्णिमा पालेकर, शीला भोंडवे, माजी नगरसेविका शमीम पठाण, सिंधुताई पांढरकर, उपाध्यक्ष सुप्रिया पवार, प्रदेश सरचिटणीस मीनाक्षी उंबरकर, सविता धुमाळ, मेधा उमखकर, लता पिंपळे, विजया काटे, पियू सहा, प्रमिला जगताप, सुनीता काळोखे, कांता भालेकर आदी उपस्थित होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.