Chinchwad : आदर्श गणेशोत्सव जनजागृती’ चळवळीला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज- हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील विविध ठिकाणच्या विसर्जन घाटावर ‘आदर्श गणेशोत्सव प्रबोधन मोहीम’राबविण्यात आली. या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

हिंदु जनजागृती समिती मागील पंधरा वर्षांपासून गणेशोत्सवाच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात ‘आदर्श गणेशोत्सव प्रबोधन मोहीम’ राबवत आहे. याअंतर्गत गणेशोत्सवापूर्वी, गणेशोत्सवाच्या कालावधीत आणि विसर्जनाच्या वेळी विविध प्रबोधनात्मक उपक्रम घेऊन जनजागृती केली जात आहे. या वर्षीही संपूर्ण पुणे जिल्ह्यात समितीने ही मोहीम राबविली त्याला समाजातूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चिंचवड येथील काकडे पार्क मधील घाट,मोरया गोसावी मंदिर येथील घाट,बिर्ला हॉस्पिटल जवळील घाट,रावेत येथील घाट आणि पिंपरी गावातील घाट तसेच तळेगाव या ठिकाणी समितीचे कार्यकर्ते हातात प्रबोधनात्मक फलक घेऊन प्रबोधन करीत होते.

गणपतीची आपण जेवढ्या भावभक्तीने पूजा करतो त्याच प्रमाणे त्याचे विसर्जन हे शास्त्रानुसार वाहत्या पाण्यात झाले पाहिजे. सध्या ज्या कुप्रथा सुरू झाल्या आहेत त्यामुळे देवतांचा अनादर होत आहे हे बंद झाले पाहिजे.अशी प्रतिक्रिया भाविकांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.