Chinchwad: जितो करंडक स्पर्धेत हिट मशीन संघाचा रोमहर्षक विजय

एमपीसी न्यूज – जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनाझेशन (जितो) आयोजित मर्यादीत षटकांच्या क्रिकेट सामन्यांत हिट मशिन संघाने जैन सुपर किंग संघावर रोमहर्षक विजय मिळवीत यंदाच्या ‘ जितो चषका’वर आपले नाव कोरले. अत्यंत रंगतदार झालेल्या या स्पर्धेत वीस संघ सहभागी झाले होते. महिला व पुरुष यांनी एकत्र खेळत या समान्यांचा आनंद लुटला.

अंतिम सामन्यात हिट मशीन संघाने 85 धावांचे लक्ष्य जैन सुपर किंग समोर ठेवले होते. चुरशीच्या या सामन्यात हिट मशीन संघाने 15 धावांनी विजय मिळविला. चेतन जैन सामनावीर ठरला. महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष राजेश साकला, खजिनदार राजेंद्र जैन, चिंचवड-पिंपरी जितोचे अध्यक्ष संतोष धोका, सेक्रेटरी नेमीचंद ठोले यांच्या हस्ते विजयी संघाला 31 हजारांचे पारितोषिक व ‘जितो करंडक’देण्यात आला. उपविजेत्या संघाला 21 हजार व करंडक व तृतीय स्थानी असणाऱ्या गोल्डन आर्म संघाला 11 हजार व करंडक देऊन सन्मानित करण्यात आले.

पुरुष गटात आदेश सोनिगिरा उत्कृष्ट फलंदाज, कमलेश मुथा उत्कृष्ठ गोलंदाज, महिला गटात रश्मी बोरा मालिका वीर ठरली, लीना पोरवाल व प्रणिता जैन या उत्कृष्ठ गोलंदाज ठरल्या. विजेत्या संघाचे प्रायोजक श्री महावीर राखी (आस्था) व उपविजेत्या संघाचे सिद्धिविनायक ग्रुप हे प्रायोजक होते. तीन दिवस रंगलेल्या या सामन्यांत 20 संघांनी सहभाग नोंदविला.

खेळाच्या माध्यमातून एकत्रित येत ऋणानुबंध घट्ट व्हावेत यासाठी  या स्पर्धेचे आयोजन केल्याचे अध्यक्ष संतोष धोका यांनी सांगितले. रौनक जैन, यश कुंकुलोळ, चिराग चोरडिया, रोहन जैन, मटीज जैन, पराग कुंकुलोळ, दर्शन सोनिगिरा यांच्यासह युवा ग्रुप व महिला ग्रुपच्या सभासदांनी स्पर्धेसाठी योगदान दिले.

या प्रसंगी महिला दिनाचे औचित्य साधत विशेष कार्यक्रम घेण्यात आला. महिलांसाठी विविध क्षेत्रात विशेष संधी जितोने उपलब्ध केल्याचे महिला अध्यक्षा तृप्ती कर्नावट यांनी सांगितले, पूनम बंब, अर्चना चोरडिया यांनी महिला गटातील विशेष क्रिकेट सामन्यासाठी योगदान दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.