BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : रिक्षा पार्क करण्यावरुन चालकावर तलवारीने वार

एमपीसी न्यूज – रिक्षा पार्क करण्यावरुन दोन रिक्षाचालकांमध्ये वाद झाला. दोघांनी मिळून एका रिक्षाचालकावर लोखंडी कोयता आणि तलवारीने वार केले. ही घटना शनिवारी (दि. 18) रात्री आठच्या सुमारास आनंदनगर, चिचवड येथे घडली.

संजय तायप्पा दावनोळ (वय 32, रा. आनंदनगर, चिंचवड) असे जखमी रिक्षाचालकाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी चिंंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अजय सुरेश कांबळे (वय 30), प्रशांत सुरेश काळे (दोघे रा. आनंदनगर, चिंचवड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय, अजय आणि सुरेश एकाच परिसरात राहतात. शनिवारी रात्री त्यांच्यात रिक्षा पार्क करण्यावरुन वाद झाला. यामध्ये अजय आणि सुरेश यांनी संजय यांच्यावर लोखंडी कोयत्याने आणि तलवारीने वार केले.

संजय यांच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2