Chinchwad : समाधान बारमध्ये गेलेल्या इसमाला मारहाण

एमपीसी न्यूज – दारू पिण्यासाठी बारमध्ये गेलेल्या एका इसमाला दोघांनी मिळून मारहाण केली. तसेच काचेचा ग्लास त्याच्या डोक्यात मारला. ही घटना बुधवारी (दि. 29) रात्री साडेआठच्या सुमारास समाधान बार, पडवळ आळी, चिंचवडगाव येथे घडली.

विनायक दत्तात्रय मोरे (वय 36, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रोहित तानाजी गायकवाड (रा. जाधववाडी चिखली), अविनाश निघोजकर (रा. चिंचवडगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास विनायक चिंचवडगाव येथील समाधान बारमध्ये दारू पिण्यासाठी गेले. त्यावेळी रोहित याने त्यांना विनाकारण शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या डोक्यात काचेचा ग्लास फेकून मारला.

फुटलेला ग्लास आरोपींनी विनायक यांच्या चेहऱ्यावर मारला. यामध्ये विनायक गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपींनी विनायक यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच पुन्हा मारण्याची धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चिंचवड पोलीस तपास करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.