Chinchwad : एच.आय.व्ही. पॉझिटिव्ह असणाऱ्यांना मुले निगेटिव्ह होतात ही बाब आरोग्याच्या दृष्टीने चांगली – नचिकेत कोडकणी

एमपीसी न्यूज – एच.आय.व्ही. पॉझिटिव्ह असणाऱ्यांना मुले निगेटिव्ह होतात ही बाब आरोग्याच्या दृष्टीने चांगली आहे, असे प्रतिपादन चाकण येथील महिंद्रा व्हेईकल फॅन्युफॅक्चरर्स उद्योग संस्थेचे प्रकल्प प्रमुख नचिकेत कोडकणी यांनी आज केले.

चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयात चाकण येथील महिंद्रा व्हेईकल मॅन्युफॅक्चरर्स, यश फाऊंडेशन, प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, नेटवर्क ऑफ पॉझिटीव्ह पीपल्स अ‍ॅण्ड चिल्ड्रेन लिव्हिंग विथ एच.आय.व्ही, (एन.पी.सी.), एन.एम.पी.प्लस, पुणे, विहानप्रकल्प मालेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित मंगल मैत्री मेळावा आयोजित केला होता.

इच्छुक एच.आय.व्ही. सहजीवन जगणार्‍यांसाठी वधू-वर परिचय मेळाव्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, मुंबई, ठाणे, जळगाव, धुळे, सोलापूर, नागपूर, हिंगोली, मनमाड व राज्याबाहेरील गडचिरोली, गुजरात, तेलंगणा येथील सुमारे चारशे पन्नास जणांनी सहभाग नोंदविला. याचे उद्घाटन चाकण येथील महिंद्रा व्हेईकल मॅन्युफॅक्चरर्स उद्योग संस्थेचे प्रकल्प प्रमुख नचिकेत कोडकणी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने केले.

यावेळी व्यासपीठावर कमला शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा प्रतिभा शहा, संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटचे संचालक डॉ. सचिन बोरगावे, संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया, यश फाऊंडेशनचे अध्यक्ष रविंद्र पाटील समवेत चाकण येथील महिंद्रा उद्योग संस्थेचे वरिष्ठ महाव्यवस्थापक मार्शल थॉमस, सहाय्यक व्यवस्थापक सनी लोपेज उपस्थित होते.

यावेळी प्रकल्प प्रमुख नचिकेत कोडकणी म्हणाले, सामाजिक जाणिवेच्या भुमिकेतून महिंद्रा व्हेईकल मॅन्युफॅक्चरर्स उद्योग संस्था गेली काही वर्षे एच.आय.व्ही. साठी जनजागृती व पूनर्वसनाचे विविध ठिकाणी कार्यक्रम राबवित आहे. सुरूवातीला खूपच अत्पल्प प्रतिसाद मिळाला होता. आज इच्छूक एच.आय.व्ही. सहजीवन जगणार्‍यांसाठी वधू-वर परिचय मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थिती आहे. हे मोठे यश आहे.

पूर्वी कोष्ठरोग व्यक्तींना खूप त्रास सहन करावा लागत होता, काही ठिकाणी त्यांना बहिष्कृत देखील करण्यात येत होते. त्याचप्रमाणे चिकनगुण्या बाधा झालेल्या व्यक्ती पूर्वी मोठ्या संख्येने मृत पावले आहेत. परंतू आता परिणामकारक औषध निर्मितीमुळे असाध्य रोगांवर उपचार होत आहे. एच.आय.व्ही.बाबत आजही समाजात अनेक गैरसमज आहेत, ही चुकीची गोष्ट आहे, आज वधू-वर मेळाव्यात परिचय होऊन ज्यांनी लग्न जुळतील त्यांनी सर्वसामान्यांप्रमाणे आपला संसार करावा, असे आवाहन केले.

कमला शिक्षण संस्थेचे सचिव व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. दीपक शहा म्हणाले, आज विज्ञान क्षेत्रात नवनवीन शोध लागत आहे. विविध रोगावर लसीकरण परिणामकारक औषध निर्मिती यामुळे एच.आय.व्ही.लागन झालेल्यामधील व्यक्तींची मनातील भिती कमी होत चालली आहे. सरकार, स्वयंसेवी संस्था देखील त्यांच्यात जनजागृती करून त्यांना मुख्य समाज प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

या कार्यक्रमानिमित्त शहा पुढे म्हणाले, आपल्यातील न्यूनगंड दूर करा, आपल्याला होणारे दुःख त्यातून होणारा त्रास मनातून हद्दपार करा, आज विवाहासाठी जे वधू-वर इच्छुक आहेत. भविष्यात ज्यांनी लग्न होतील, त्यांनी मनापासून नवजीवनाला सुरूवात करा, यापुढे तणावग्रस्त राहू नका समाजात आजही काहीजण अशांना अस्पृश्य मानतात, ही त्यांच्या मनात चुकीची भावना आहे. अशा प्रकारचे मेळावे भरविण्यासाठी कमला शिक्षण संस्था व त्यातील सहकारी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील दरवर्षी मंगल मैत्री मेळावा कार्यक्रमाची संधी आम्हाला मिळावी.

कार्यक्रमाची प्रस्तावना यश फाऊंडेशनचे अध्यक्ष रविंद्र पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रकल्प समन्वयक चंदा थेटे यांनी तर, आभार प्रा. निजी साजन यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काजल थोरात, प्राची खरे, वैभव पवार समवेत प्रतिभा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी वर्गाने विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.