Chinchwad : मदर तेरेसा पुलावर होंडा सिटी गाडीचा भीषण अपघात; एका तरुणीचा मृत्यू

अपघातातील तरुणी डी वाय पाटील कॉलेजच्या विद्यार्थी

एमपीसी न्यूज-चिंचवड येथील मदर तेरेसा उड्डाण पुलावर एम्पायर इस्टेटजवळ भरधाव वेगात आलेल्या होंडा सिटी गाडीचा  अपघात झाला आहे. हा अपघात आज (शनिवारी) पहाटे झाला आहे.या अपघातातील  एका महिलेचा थेरगाव हॉस्पिटलमध्ये  मृत्यू झाला आहे.  अजून 5 जण गंभीर जखमी असून त्यांना डी वाय पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे समजते.

MPC News Podcast 29 April 2023 – ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

गाडी चिंचवडकडून काळेवाडीच्या दिशेने जात होती.अपघात झालेल्या गाडीचा क्रमांक DL4CAW3642 असा असून गाडीचा वेग जास्त असल्याने गाडी बाजूचे डिवायडर तोडून पलटली. यात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.