Chinchwad : हॉटेल व्यावसायिक दांपत्याला टोळक्याची मारहाण

एमपीसी न्यूज – हॉटेल बंद करून घरी जाणाऱ्या हॉटेल व्यावसायिक दांपत्याला टोळक्याने मारहाण केली. तसेच महिलेवर तलवार उगारून धमकी दिली. हा प्रकार गुरूवारी पावणेअकरा वाजता रहाटणीतील संस्कृती हॉटेल समोर घडला.

याप्रकरणी मालिनी संजय नखाते (वय 40, रा. रामनगर, अमृतवेल कॉलनी, रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आकाश शेटप्पा कुसाळकर (वय-22, रा. कृष्णाई कॉलनी, रामनगर, रहाटणी) याला अटक केली असून त्याचे साथीदार संदीप सूर्यवंशी, ज्ञानेश्वर सगर, अजय मस्के याच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे रहाटणीत संस्कृती नावाने हॉटेल आहे. या हॉटेलसमोर भांडणे झाल्याने फिर्यादी व त्यांचे पती हॉटेल बंद करत होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी तलवार, हॉकी स्टीक घेऊन फिर्यादी व त्यांचे पती संजय नखाते यांच्या अंगावर धावून गेले. यावेळी मालिनी या पतीला वाचविण्यासाठीमध्ये पडल्या. त्यांनी पतीला पळून जाण्यास सांगितले.

यावेळी फिर्यादी आरोपींना बायकांवर हल्ला करताय काय, लाज वाटत नाही काय? असे म्हटल्याने आरोपी संदीप सूर्यवंशी याने त्यांच्या अंगावर तलवार उगारून तुम्हालाही सोडणार नसल्याची धमकी दिली. त्यांच्या अंगावर दगड मारला. आरोपींनी अमृतवेल, बळीराज कॉलनीमध्ये पार्क केलेल्या 8 मोटारींच्या काचा फोडल्या. तसेच आयसीआयसीआय बॅंकेचे एटीएम सेंटरची काच फोडली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

वाकड पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.